उच्च विद्याविभूषित धुरंधर राजकारणी
एड.फिरोज शेकूवाले याचां विद्यार्थी दशा ते शिक्षण सभापती एक प्रेरणादायी प्रवास
ऐतिहासिक व शैक्षणिक प्रगत शहरात अप्रगत व शिक्षणाची वाणवा असलेल्या वस्तीत विद्यार्थी दशेत नगर परिषदेचा शिक्षण सभापती बनून युवा सक्रिय सृजनशील व्यक्तिमत्वाचा धनी युवा नगरसेवक तथा गटनेता फिरोज शेकूवाले याने महाविद्यालयीन जीवनात नेतूत्व व संघटन कौशल्य आत्मसात करीत राजकीय जीवनात व सामाजिक परिघात प्रवेश केला. त्याचा विद्यार्थी दशेतच शिक्षण सभापती बनण्याचा प्रेरणादाई प्रवास शहर व परिसरातील युवकांसाठी आदर्शवत ठरत आहे.
त्याने एम ए इंगजी, मराठी व बीएड तसेच वैधानिक क्षेत्रात सन्माननीय असणारी एलएलबी ह्या पदव्या संपादन करत असताना त्यांच्यातील नेतूत्व गुण हेरून पक्षाने त्यांना गटनेता पदी आरूढ केले.अंत्यत समंजसपणे व विवेकी आक्रमकतेने गावातील प्रश्नांना बोलके केले.तरुण वयात राजकीय मूसद्दी पणा दाखवून आपल्या चाणक्य नीतीचा चातुर्याने वापर करून कारंजा शहरातील समस्यां सोडविल्यात सभेत बाजू मांडताना पक्षीय जाण ठेवली. राजकारणी व सामान्य जनतेत परिपक्व दुवा बनून कार्य केले. अल्पवयात त्यांनी बौद्धीक प्रगलभता दाखवली. प्रसंगी विनयशीलता सयंम सापेक्ष आक्रमकता या सर्वाचा संयमी समन्वय साधून प्रशासनात आपला प्रभाव निर्माण केला.
एड.फिरोज शेकूवाले यांनी निष्पक्ष सजग पत्रकार म्हणून त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले. पत्रकारितेमध्ये पारदर्शकतेने आपली विशेष प्रतिमा तयार केली. जागृत पत्रकार म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले. स्वच्छ प्रतिमा ठेवली प्रवाहपतित झाले नाही. तर उत्तम चरित्र पार्दशकता संयमी वृत्तीचे जतन केले.
फिरोज शेकुवाले यांचे शिक्षण पदवी ते पदवीधर पर्यंत कारंज्यातच झाले. त्यांनी शिक्षणाची सुरवात शहरातील ९० च्या दशकातील नामवंत विश्वभारती इंग्लिश कॉन्व्हेंट मधून झाली मात्र बालपणापासूनच काही वेगळे करण्याची इच्छा असल्यामुळे प्राथमिक शिक्षण कारंजातील ४ वेग-वेगळ्या शाळांमध्ये व तीन भाषेत त्यांनी घेतले. घरात सर्वांपेक्षा लहान असल्यामुळे घरच्यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्या वेळी त्यांचे वडील नगर पालिकेमध्ये उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते. त्यामुळे कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेणे कठीण गेले नाही. विश्वभारती नंतर न.प.हिंदी शाळेमध्ये प्रवेश केला. नंतर प्रसिद्ध जे.सी. चवरे हायस्कूल मध्ये ५ व्या वर्गात प्रवेश करून ६ व्या वर्गात गेल्यावर आणखी शाळा बदलली व प्रसिद्ध जे.डी.चवरे विद्यामंदिर मध्ये प्रवेश घेतला.मात्र २ दिवसांतच तेथूनही आपली टी.सी.काढण्यासाठी वडिलांकडे त्यांनी आग्रह धरला व शेवटी विवेकानंद हिंदी हायस्कूल मध्ये प्रवेश घेऊन १० पर्यन्तचे शिक्षण पूर्ण केले.नंतर ११ वी विज्ञान मध्ये विद्याभारती महाविद्यालयात प्रवेश केला परंतु आठ दिवसांनीच प्रवेश रद्द करून ११ वी कला या शाखेत कि.न. महाविद्यालयात प्रवेश करून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. दरम्यान शिफा मोबाईल शॉप या नावाने २००९ मध्ये स्वतःचे व्यवसाय सुरू केले.इलेक्ट्रॉनिकचा ज्ञान असल्यामुळे कंम्प्युटर हार्डवेअर एंड सॉफ्टवेअर दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती चे काम सतत करीत राहिले व पुन्हा उच्च शिक्षणाकडे परतले.आदर्श शिक्षण महाविद्यालयातुन बी.एड.ची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.बी.एड.चे शिक्षण संपवून सन २०११ मध्ये कारंजा लोकमत कार्यालयात समाचार प्रतिनिधी रुजू झाले.अगदी अल्पावधीतच पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले कसब दाखवूनदिले. ध्येयावर लक्ष ठेऊन पत्रकारिता करीत असतानाच मराठी व इंग्रजी विषयात एम.ए.पूर्ण करून पत्रकरितेची सुध्दा पदवी प्राप्त केली.सुरवातीपासूनच शिक्षणाची आवड असल्याने एम.ए.मराठी, एम.ए.इंग्रजी, बी.एड.आणि एम.जे.एम.सी.एलएल.बी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर पत्रकारितेसोबत काय करावे ? हा प्रश्न उपस्थित झाला. त्यातच सन २०१४ मध्ये कारंजा नगर पालिकेच्या विविध शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती निघाली होती. शिकविण्याचा अनुभव मिळावा म्हणून इतर उमेदवाराप्रमाणे अर्ज केला.तत्कालिन मुख्याधिकारी, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग, शिक्षण सभापती तसेच शाळेतील मुख्याध्यापक यांनी त्यांची रितसर तोंडी मुलाखत घेतली. पत्रकार असल्याने नानाविध प्रश्नांची जाणीवपूर्वक सरबत्ती करण्यात येऊन भरतीतून बाद करण्यात आले. त्या नंतर वृत्तपत्रासोबतच स्थानिक न्यूज चॅनल मध्ये उपसंपादक म्हणून वर्षभर कार्य केले.असं म्हणतात की प्रामाणिक प्रयत्न सुरु ठेवले तर नशीब पालटायला वेळ लागत नाही. हेच त्यांच्या सोबत घडलं.नोव्हेंबर २०१६ मध्ये कारंजा नगर पालिकेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.त्या करिता युसूफसेठ पुंजानी यांनी भारिप बहुजन महासंघाकडून त्यांच्यावर विश्वास दर्शवला व नगर सेवक पदाकरिता उमेदवारी घोषित केली. दरम्यान मतदारांनीही त्यांना १०१ मतांनी निवडून दिले. नव्हे तर त्यांच्यावर १०१ टक्का विश्वासच टाकला.आतापर्यंत ते लेखणीतून कारंजावासीयांचे गाऱ्हाणे मांडत आले. समस्या सुटेपयर्यंत भांडत राहिले. आताही तेच करणार असून फक्त भूमिका तेवढी बदलली. पत्रकार ते लोकप्रतिनिधी झाले. त्यासाठी त्यांना कुठला खर्च करावा लागला, ना आश्वासनं द्यावी लागली, ना प्रचारसभा घ्याव्या लागल्या. उलट त्यांच्या विरोधात खासदार, आमदारांनी घराघरांत प्रचार केला. एवढेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांचीही कारंजात व त्यांच्या प्रभागात प्रचारसभा झाली. पण, केवळ जोडलेली माणसं आणि विधायक पत्रकारिता याच बळावर हे यश त्यांनी संपादन केले.या पश्चात पक्षाध्यक्षानीं व नवनिर्वाचित नगरसेवकांनी त्यांना सत्ताधारी पक्षाचा गटनेता या पदावर आरूढ केले. व आज गटनेत्यासोबत शिक्षण सभापती या पदावर ते कार्यरत आहे.
शब्दांकन-
प्रा. सूर्यकांत जिरापुरे, कारंजा (लाड)


Comments
Post a Comment