firoz shekuwale फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड) **गाेवंश हत्या बंदी कायद्याचा परिणाम
**शेतकरी चिंतेत | पूर्वी ४० हजारांना विकल्या जाणारी बैलजाेडी १० हजारांनाही काेणी घेईना; गोवंश हत्याबंदीचा परिणाम
**भाकड बैलांना सांभाळावे कसे; शेतकऱ्यांसमाेर प्रश्न
**पशुपालक अडचणीत
**गाेवंश हत्या बंदी कायद्याचा परिणाम
**जिल्ह्यात भाकड बैलांचे भाव घसरले
**ग्राहक शोधून सापडेना
**९ गुरांचे बाजार जिल्ह्यात अाहे.
**गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे आता गायी सोबतच वळू आणि बैल यांचीही हत्या करणे झाला अाहे गुन्हा
**१८ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा आहे. त्यामुळे शासनाने गाेशाळांना अनुदान द्यावे. तसेच या गाेशाळांमध्ये भाकड बैलांनाही ठेवण्यात यावे, तरच या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी हाेईल.
फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड)
.............................. ....................
राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. परिणामी, जिल्ह्यातील गुरांच्या बाजारांमध्ये भाकड बैलांचे भाव घसरले असून, तरुण बैलजोडीच्या भावातही थोडी घसरण झाली आहे. कायद्यापूर्वी भाकड बैलांची जी जोडी ३० ते ४० हजार रुपयांना विकली जात होती, त्याच बैलजोडीला आजघडीला ते १० हजार रुपयांमध्येही ग्राहक सापडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाकड बैलांना कसे सांभाळावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २६ फेब्रुवारीला राज्य सरकारच्या कायद्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. यामुळे तब्बल २० वर्षांनंतर राज्यात कायद्याने गोहत्याबंदी लागू झाली. मात्र, या कायद्यामुळे आता गुरांच्या बाजारांमध्ये भाकड बैलांना खरेदी करण्यासाठी ग्राहकच नाहीत. दरम्यान, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तरुण बैलजोडीला खरेदी करण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
......................
कायद्याचा इतिहास
१९९५ मध्ये युती सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत तसे विधेयक संमत करून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, राज्यात १९९९ मध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आले. या विधेयकाच्या अंमलबजावणीसंदर्भात आघाडी सरकारचे मत काय आहे, याची विचारणा राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून करण्यात आली. मात्र, मत कळवले गेले नाही. पुन्हा वर्ष २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिवसेना सरकारने आपले मत कळवले. परिणामी, २६ फेब्रुवारी २०१५ रोजी राष्ट्रपतींनी या कायद्याला मंजुरी दिली.
.............................. .........................
गोहत्याबंदी आणि गोवंश हत्याबंदी यात फरक
गोहत्याबंदी आणि गोवंश हत्याबंदी यामध्ये फरक आहे. स्वतंत्र भारतात जम्मू काश्मीर ने पहिल्यांदा गोहत्याबंदी कायदा लागू केला. महाराष्ट्रात तो १९६७ मध्ये महाराष्ट्र अॅनिमल प्रिझर्व्हेशन अॅक्टखाली लागू झाला.
.............................. ....................
भावांमधील फरक
कायदा लागू होण्यापूर्वीचे असे
सुदृढ बैलांची जोडी- - 1 ते 1 लाख २५ हजार
भाकड बैलांची एक जोडी -30 ते 40
.............................. ............................
कायदा मंजूर झाल्यानंतर
सुदृढ बैलांची जोडी- ७० ते ८० हजार
भाकड बैलांची एक जोडी-8 ते १0 हजार
.............................. ......................
१९९५ मध्ये युती सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
.............................. .....................
कायदा नकोच
गोहत्याबंदी आहेच. त्याची अंमलबजावणी ही होत आहे. शेतकरी सुद्धा गायीला मा समान मानतात. पण, गोवंश हत्याबंदी कायदा नको.'' विलास डोंगरे, शेतकरी. कारंजा
.............................. ..................
कायद्याचे स्वागतच
गोवंशहत्याबंदी कायदा हा स्वागतार्हच आहे. यासाठी आम्ही प्रदीर्घ काळ लढा दिला. मात्र, शासनाने आता त्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.'' राहुल महाजन, गोप्रेमी, कारंजा
.............................. .............
पहिल्यांदा केला सम्राट बाबर यांनी कायदा
भारतातपूर्वीपासून गोहत्या हाेत असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळेच बहुसंख्य असलेल्या हिंदूंची धार्मिक भावना लक्षात घेऊन आणि आपल्याला राज्य करण्यास सोपे जावे, या हेतूने सम्राट बाबर यांनी भारतात पहिल्यांदा गोहत्याबंदी कायदा केला. त्यांच्या काळात कुणी गोहत्या करताना पकडला गेला तर त्याला कडक शिक्षाही दिली जात होती होती, असे काही पुरावे इतिहासात अाहेत. त्यामुळे पहिल्यांदा गाेहत्याबंदीचा कायदा त्यांनी केला.
.............................. .............................. ...
जिल्ह्यातील प्रमुख गुरांचे बाजार कारंजा येथे
गुरांचेबाजार वाशीम येथे रविवारी भरतात. मात्र, कारंजा आणि मानोरा येथील सोमवारी आणि रिसोड,अनसिन, कामरगाव येथील बाजार गुरुवारी भरतो. तर बुधवारी शेलूबाजार व मंगळवारी मालेगाव येथील बाजार भरतो. कारंजा आणि वाशीम हे मोठे बाजार आहेत. या ठिकाणी एका दिवसांत किमान १५० ते २०० बैलांची विक्री होते. बाहेर राज्यातूनसुद्धा येथे बैल विक्रीसाठी येतात.
.............................. ...................
पशुधन घटले
१९५१मध्ये एक हजार व्यक्तींमागे ४२६ पशू होते. १९९१ मध्ये २१६ झाले. त्यामुळे गोवंशाची संख्या वाढवायची असेल तर हा कायदा महत्त्वाचा आहे.
.............................. ......................
65 देशांमध्ये भारतातून १९६० पासून गोवंश-मांस निर्यात केले जाते.
.............................. .............................
मांसाच्या निर्यातीत १७ टक्क्यांनी वाढ
जागतिकबीफ बाजारात भारताचा वाटा तब्बल २० टक्के असून, हा जगातील दुसरा क्रमांक आहे. गेल्या वर्षी भारताला गोवंश-मांस निर्यातीतून सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. एप्रिल २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. तेव्हापासून नोव्हेंबर २०१४ या काळात मांस आणि मांसापासून तयार पदार्थांच्या निर्यातीत तब्बल १७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
.............................. ..........
जनावरे एक हजार व्यक्तींमागे 172 उरलेली आहेत
हे सर्व जण या कायद्यामुळे बेकार होणार आहेत.
.............................. ....................
गुरे विक्रीतून ७ हजार व्यक्तींना रोजगार
.............................. .............
गुरांचे व्यापारी जिल्ह्यात आहेत.
७६०
.............................. .....
Comments
Post a Comment